Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नांदेड- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. कोरोना वॉर्डमध्ये मोठ्याने बोलू नका म्हंटल्यावर रुग्णाच्या नातेवाईकांचा राग अनावर झाला आणि त्याने थेट चाकू घेऊन डॉक्टरवर धावून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. रुग्णालयातील उपस्थितांनी आरोपीचा हात धरून चाकू काढून घेतल्याने अनुचित प्रकार टळला असून आरोपी भाऊसाहेब गायकवाड याच्या विरोधात शासकीय कामात अडथसला तसेच अन्य कलमानव्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील आरोपीस मुखेड पोलिसांनी केले अटक आहे.
#solapurcitynews