fbpx
Solapur City News 25

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका, नगर परिषदांना निर्देश
मुंबई – कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असतानाच रुग्णालयात दाखल होण्याऐवजी होम क्वारंटाइन होण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. मात्र, होम क्वारंटाइनचे काटेकोर पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्यामुळे होम क्वारंटाइनच्या नियमांचे कठोर पालन रुग्णांकडून होईल, याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घ्यावी, तसेच टेस्ट आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, असे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांना दिले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची बैठक बोलावली असून सोमवारी अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागातील महापालिका आणि नगर परिषदांची बैठक सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतानाच त्यांच्या अडचणीही श्री. शिंदे आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी जाणून घेतल्या. होम क्वारंटाइन रुग्णांचे ट्रॅकिंग करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करून रुग्णांचे नियमित ट्रॅकिंग करण्याचे आदेश त्यांनी सर्व महापालिका आणि नगरपालिकाना दिले. रुग्णालये, तसेच कोव्हीड केअर सेंटर येथे कुठल्याही प्रकारची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा  शिंदे यांनी दिला. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे वाढीव बेड्सचे नियोजन करण्याचे निर्देश  शिंदे यांनी यावेळी दिले. याशिवाय ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रुग्णालये आणि कोव्हीड सेंटर्समधील एसी, पंखे आदी सुविधांबाबत तक्रारी न येण्याची काळजी घ्या, रुग्णांना दोन वेळचे उत्तम जेवण, नाश्ता, गरम पाणी मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्यामुळे सर्व केंद्रांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देशही  शिंदे यांनी दिले. तसेच, महिला रुग्णांच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. निधी कमी पडू देणार नाही. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोविडच्या केसेस वाढत असताना कोविडचा वाढता प्रादुर्भाव थोपवताना पालिका आणि नगरपालिकांना प्रशासनाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही  शिंदे यांनी दिली. लोकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update