award movement for social change
Religious

Award : कीर्तनकारांनी समाज बदलाची चळवळ उभी करावी – येळेगावकर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

अध्यात्म सेवा पुरस्कार ह.भ.प.श्याम जोशी यांना प्रदान
सोलापूर Award- कीर्तन हे समाजप्रबोधनाचे साधन असून कीर्तनकारांनी त्यातून समाज बदलाची चळवळ उभी करावी,असे आवाहन हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी केले. भंडारकवठे येथील सत्संग मंडळ व कुलकर्णी परिवार यांच्या वतीने ह.भ.प.अनंतराव कुलकर्णी यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा अध्यात्म सेवा पुरस्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचे ह.भ.प.श्याम जोशी यांना रविवारी सोलापुरात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.मानधन,मानपत्र,स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून डॉ.येळेगावकर,ह.भ.प.काशीनाथ सर्जे आणि दक्षिण सोलापूरचे ग्रामविस्तार अधिकारी संजयमहाराज पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार जोशी यांना प्रदान करण्यात आला.

          Award सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकत पुढे बोलताना डॉ.येळेगावकर म्हणाले,बालविवाह,व्यसनाधीनता,सामाजिक व कौटुंबिक हिंसाचार आणि अत्याचार वाढत चालल्याने समाजस्वास्थ बिघडत चालले आहे. कीर्तन व प्रवचनातून समाज बदल नक्कीच होवू शकेल तेव्हा कीर्तनकारांनी ही एक चळवळ गतीमान केली पाहिजे.समाजात चांगले काम करणार्‍यांना पुरस्कार दिला जातो.अशा पुरस्कारातून त्या व्यक्तीची गुणवत्ता समाजासमोर येते तसेच त्यातून पुढे अजून काम करण्याची उर्मी येते,असेही ते म्हणाले. जोशी हे अत्यंत परिश्रम घेवून वडिलांचा कीर्तन व प्रवचानाचा वारसा चालवत आहेत.भगवतांला हृदयात अडकावून ठेवायचे असेल तर आपल्या अंगी नम्रता हवी. तिच नम्रता जोशी यांच्यात आहे,असे संजयमहाराज यावेळी बोलताना म्हणाले.गरूड पुराणातील दाखले देत काशीनाथ सर्जे यांनी मातृ व पितृऋण याविषयी भक्तांना प्रबोधन केले. हा पुरस्कार Award मिळाल्याबद्दल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय आराध्ये यांनी जोशी यांचा सत्कार केला. प्रारंभी अनंतराव कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर कुलकर्णी यांच्या हस्ते अतिथींचा सन्मान करण्यात आला. शेतकरी संघटनेचे उमाशंकर पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. मंडळाचे प्रमुख विजय बिज्जरगी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु.शिवरंजनी कुलकर्णी व ऋषिकेश कुलकर्णी व अजय वेदपाठक आदींनी परिश्रम घेतले.
पुरस्कार Award विषयी कृतज्ञता व्यक्त करताना जोशी म्हणाले की- कीर्तनाची मिरासी आपले वडील स्व.मधुकर जोशी यांच्याकडून मिळाली.आजची अवस्था समाज अवस्था पाहिली तर प्रबोधन अधिक गतीमान करण्याची गरज आहे. डॉ.येळेगावकर यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आम्ही वारकरी संप्रदायातील लोक पात्र राहून हे काम करत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com