Award: Social activist
Maharashtra

Award : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग समाजरत्न पुरस्काराने समाजसेवक आनंद गोसकी यांचा गौरव

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापुर Award – येथील समाजसेवक आनंद गोसकी यांना ही राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय आयोगाचे राष्ट्रीय सेक्रेटरी छाया तिवारी, एम. आय. पटेल, लोछना चव्हाण, अभिजीत राणे,अखिलेश चौधरी या प्रमुख अतिथींच्या हस्ते, शुक्रवारी, १० डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईत समाजरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. मुंबई येथील राष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय आयोग यांच्या कडून, शुक्रवारी, सायंकाळी मुंबई येथील गोरेगांव फिल्म स्टुडिओ, एस.व्ही. हाॅलमध्ये मोठ्या थाटात पार पडलेल्या सोहळ्यात अविरहित सामाजिक कार्य व रूग्णसेवेची दखल घेऊन जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हे वाचा – बँक खात्यावर कोणी पैसे ट्रान्सफर केल्यास लागणार 25 रूपये दंड

          Award मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानवाधिकार पुस्तकाचे प्रकाशन करून भारतातील अनेक राज्यात, विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या समाजरत्नांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यात सोलापूरचे समाजसेवक आनंद गोसकी यांचा समावेश असणे, सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय Award आयोगाचे कार्य असेच मोठ्या प्रमाणात वृध्दिंगत होत राहो, माझ्यासारख्या सामान्य युवकाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्याची राजधानी, मुंबई महानगरात, मला समाजरत्न देऊन सन्मानित करुन, मला उर्जा देण्याचं काम या टीमचे केले असल्याची भावना व्यक्त करून रुग्णसेवक आनंद गोसकी यांनी संयोजकाचं आभार व्यक्त केले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews