Awards to veterans from armed forces
Maharashtra

राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  माता, मातृभाषा व मातृभूमी यांप्रति प्रेम बाळगून प्रत्येकाने समर्पित भावनेने कार्य केल्यास भारताला जगातील सर्वात सुंदर देश बनवता येईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी व जवान यांना मातृभूमी भूषण सन्मान 2021 प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षण भूषण, साहित्य भूषण, समाज भूषण व सेवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, हिंदी अकादमीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पाण्डेय व उपाध्यक्ष डॉ. आलोक चौबे उपस्थित होते.

             अलीकडच्या काळात देशात तौक्ते वादळ, भूस्खलन, अतिवृष्टी व कोरोनासारखी संकटे आली. या सर्व संकटप्रसंगी नागरिकांनी तसेच डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, शेतकरी यांनी परस्परांना सहकार्य केल्यामुळे या संकटांना देश धैर्याने सामोरा गेला, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी आर्मी डेंटल कोरच्या वीर नारी डॉ. कांता मुखर्जी, हुतात्मा ले. कमांडर फिरदौस मोगल यांच्या पत्नी वीर नारी श्रीमती कर्झीन मोगल, ग्रुप कॅप्टन त्रिलोकी भटारा, सुभेदार विनायक उपाध्ये, मास्टर चीफ एम. प्रसाद, मेजर प्रांजल जाधव, कॅप्टन के. पी. हरिदासन, कमांडर विजय वधेरा,  सार्जंट दत्तात्रय अर्जुन उतेकर, कमोडोर बी. बी. मिस्त्री यांना मातृभूमी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रॅन इंटरनॅशनल समूहाच्या प्रमुख डॉ. ग्रेस पिंटो, मायाशंकर चौबे, पियुष शुक्ला, सौरभ पांडे यांना शिक्षण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हे वाचा– सोलापूरात 60 वर्षी पुढील वृद्धांना घरोघरी जाऊन लसटोचणीसाठी करा

              युगाराज जैन यांना साहित्य भूषण तर राजाभाऊ सेठ, डॉ मुकेश गौतम, प्रशांत फुलवणे, प्रविण राय व कमलेश नाहर यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रकाश जाधव, डॉ बालनाथ चकोर, डॉ आनंद पांडे, वेदिका चौबे व उमेश पांडे यांना  सेवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com