awareness-training-on-heart-attack
Health

हृदयविकाराचा झटका आणि वेळीच उपचाराच्या जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा समजत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इतपासून ते हृदयविकाराचे प्रकार आणि तातडीचे प्राथमिक उपचार याची माहिती असणे गरजेचे आहे. आणि अशा माहितीसह प्रशिक्षणाचा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘आय केअर’ संस्थेच्या सहकार्याने अधिकारी-कर्मचारी तसेच राज्यातील सर्व माध्यमकर्मींसाठी आयोजित केला तो अत्यंत स्तुत्य व अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी काढले.

                          आय केअर संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाच्या दूरदृश्यपणालीद्वारे प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, संचालक(प्रशासन) गणेश रामदासी, संचालक(वृत्त) दयानंद कांबळे, आय केअरचे डॉ.यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ.ब्रायन पिंटो (कार्डियोलॉजिस्ट), डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत राज्यातील अधिकारी-कर्मचारी व पत्रकार ऑनलाईन सहभागी झाले होते.

हे वाचा- भीमा सीना जोड कालव्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त

अल्प व मध्यमवयीन नागरिक सुद्धा या अकस्मात हृदयरोगाला बळी पडत आहेत. हृदयाचा झटका आणि कार्डियाक अरेस्टची घटना आपल्या आजूबाजूला घडत असते तेव्हा अशा प्रकारचे कार्डिओ पल्मोनरी रिसिटेशन (सीपीआर)ची माहिती व प्रशिक्षण असेल तर काही मिनिटाच्या सुवर्णकाळात आपण त्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो यासाठी प्राथमिक उपचाराची माहिती असणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट जनजागृतीमुळे नागरिकांचा जीव वाचविण्यास मदत होईल असेही राज्यमंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143