Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Axident – पंढरपूर सांगोला मार्गावरील कासेगाव फाटा वनीकरण जवळ किया सेलटॉस ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पाईपला जोरात धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन वारकरी जागीच ठार झाले तर इतर दोघे जखमी झाले.Axident हा अपघात रविवारी (ता. 10 जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला.

Axident जखमींना उपचारासाठी पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पीटलमध्ये दाखल केल्याची माहिती आहे. राजू संभाजी शिधोळकर व परशुराम संभाजी जवरूचे (दोघे रा. अनगुळ जि. बेळगाव )असे मयतांची नावे असून अभिजित हुंबरे व गितेश पोकशेकर असे दोघा गंभीर जखमींची नावे आहेत. मयत व जखमी हे सर्व आषाढी एकादशी निमित्त किया सेलटॉस या गाडीतून बेळगावहून पंढरपूरकडे येत होते. दरम्यान ते पंढरपूर सांगोला रोडवर कासेगाव फाटा वनीकरण जवळ आले असता त्याठिकाणी रस्त्यात एका खड्यासारखा उतार आहे, वेगात उतार समजला नाही. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या सिमेंट पाईपवर जाऊन आदळली. गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143