banks-will-be-closed-in-february
Economy

Bank : 12 दिवस फेब्रुवारीमध्ये बँका बंद राहणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

नवी दिल्ली Bank – वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. जानेवारीतही 16 दिवसांची सुट्टी होती. फेब्रुवारीच्या या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, गुरु रविदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. मात्र, फेब्रुवारी महिन्यात देशातील सर्वच बँका 12 दिवस बंद राहणार नाहीत.

              वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. फेब्रुवारी महिन्यात येणार्‍या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य किंवा प्रदेशाशी संबंधित असतात. त्यामुळे Bank बँकेच्या सुट्ट्या राज्यांनुसार बदलू शकतात. सुट्ट्यांची लिस्ट पाहूनच बँकेत जाण्याचे प्लॅनिंग करा. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही बुधवारी म्हणजेच 26 जानेवारीला बँका Bank बंद राहतील.

सुट्ट्यांची लिस्ट खालील प्रमाणे आहे
2 फेब्रुवारी : सोनम लोचर (गंगटोकमध्ये बँका बंद)
5 फेब्रुवारी: सरस्वती पूजा/श्री पंचमी/बसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)
6 फेब्रुवारी : रविवार
12 फेब्रुवारी: महिन्याचा दुसरा शनिवार
13 फेब्रुवारी : रविवार
15 फेब्रुवारी: मोहम्मद हजरत अली वाढदिवस/लुई-नागई-नी (इंफाळ, कानपूर, लखनौमध्ये बँका बंद)
16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)
18 फेब्रुवारी: डोलजात्रा (कोलकात्यात बँका बंद)
19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद)
20 फेब्रुवारी: रविवार
26 फेब्रुवारी: महिन्याचा चौथा शनिवार
27 फेब्रुवारी : रविवार

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com