basaveshwar-circle-repair-work
Solapur City Fund

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बसवेश्वर सर्कल सुशोभिकरण व दुरुस्ती कामाचे उदघाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर- सोलापूर शहरातील अनेक चौक स्मार्टसिटीच्या (Smart City) माध्यमातून स्मार्ट होत असताना,सोलापूरच्या प्रमुख बाजारपेठेतील एक चौक म्हणून कौतम चौकातील बसवेश्वर महाराजांचे चौक असताना देखील याकडे अनेक वर्षे दुर्लक्ष केले जात होते,तरी या बसवेश्वर सर्कलचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे या करिता बसवेश्वर सर्कलचे अध्यक्ष कै. ओंकार भीमाशंकर पदमगोंडा यांची धडपड होती व समस्त बसव भक्तांची मागणी पाहता नगरसेवक जगदीश पाटील यांनी त्यांच्या निधीतून बसवेश्वर सर्कलचे सुशोभिकरणं व दुरुस्ती कामाकरिता निधी दिला व या कामाचे उदघाटन पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पार पडले कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चन्नविर चिट्टे सर यांनी जगदीश पाटलांचे कौतुक करताना अण्णांचे सर्व बसवभक्तांच्या वतीने आभार मानले.

हे वाचा – ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात  शंभर टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री

        सुदीप दादा चाकोते यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व बसवभक्तांच्या वतीने नगरसेवक जगदीश पाटील यांचे आभार मानले व या सुशोभिकरणं कामासाठी निधी कमी पडल्यास अखिल भारतीय वीरशैव सभेकडून मदतीचे आश्वासन दिले नगरसेवक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या कामाचे उदघाटन आज झाले असून लवकरच या कामाची सुरुवात होऊन या चौकाचा चेहरामोहरा बदलेल असे आश्वासन त्यांनी दिले कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी नगरसेवक जगदीश पाटील, चिदानंद वनारोटे, प्रभुराज मैंद्रगीकर, सुदीप दादा चाकोते, मल्लिनाथ शाबादे, चन्नविर चिट्टे, अमर बिराजदार, संजय होमकर, प्रवीण वाले, गणेश चिंचोळी, भीमाशंकर पदमगोंडा, गुरुराज पदमगोंडा, यतीराज होनमाने, योगेश कबाडे व बसवभक्त मोठ्या संख्यने उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews