Crime निधन वार्ता

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना अतिशय दुःखद; घटनेची चौकशी करून सरकार दोषींवर कारवाई करणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून राज्य शासन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दुर्दैवाने मृत्यू झालेल्या लहान मुलांबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकार प्रयत्न करेल असे मत मंत्री भुजबळ यांनी मांडले आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची कारणे काय आहेत, हे तपासायची गरज आहे. अनेक रूग्णालये, नर्सिंग होम यांची फायर ऑडिट करण्याची गरज आहे. अनेक रूग्णालयांमध्ये वायरिंग वर्षानुवर्षे बदलली नाही, त्यावरच रुग्णालयातल्या विविध मशीन चालत असतात त्यामुळे ती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेत रुग्णालयातील परिचारिका आणि काही कर्मचाऱ्यांनी 7 बालकांना वाचवले आहे, त्या कर्मचाऱ्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. पण दुर्दैवाने आपण 10 बालकांना वाचवू शकलो नाही. त्या बालकांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली. 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143