fbpx
images 8
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पालकमंत्री भरणे यांच्या तालुकास्तरीय बैठका; लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी करणार चर्चा

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आजपासून तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात सर्वत्र लागू होती. त्यामुळे कोविडबाबत बैठका घेण्यावर आणि उपाययोजनांचे निर्णय घेण्याबाबत अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पालकमंत्री भरणे यांच्या कार्यालयाकडून मतदान झाल्यानंतर कोविड बाबत बैठका घेण्यास, उपाययोजना करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली होती. या विनंतीचा विचार करून  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास अशा बैठका घेण्यास परवानगी देणारे पत्र पाठवले आहे. यानुसार पालकमंत्री भरणे शुक्रवारपासून जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची पुढीलप्रमाणे आढावा बैठका घेणार आहेत.

(दिनांक, ठिकाण, वेळ यानुसार)

दिनांक :-23 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, अकलूज. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर. दुपारी 3 वाजता तहसील कार्यालय, मंगळवेढा. सांयकाळी 6 वाजता पंचायत समिती सांगोला.

दिनांक:- 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 वाजता पंचायत समिती, करमाळा. दुपारी 12 वाजता पंचायत समिती कुर्डूवाडी. दुपारी 3 वाजता नगरपालिका, बार्शी. सांयकाळी 6 वाजता पंचायत समिती, मोहोळ.

दिनांक:-25 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय, अक्कलकोट. दुपारी 2 वाजता नियोजन भवन सोलापूर.  

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update