Maharashtra

कर्णिक नगरातील वल्याळ क्रिडांगणात खुली व्यायाम शाळेचे भुमीपुजन संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- कर्णिक नगर येथिल वल्याळ क्रीडांगणात खुली व्यायाम शाळेचे भुमीपुजन करण्यात आले. प्रभागाचे नगरसेवक नागेश लिंगराज वल्याळ यांच्या प्रयत्नाने स्व. माजी खासदार लिंगराज बालईरय्या वल्याळ क्रीडांगण परिसर मैदानात खुल्या व्यायामाचे साहित्य स्थानिक नगरसेवक निधीतून बसविण्यात आले आहे. या व्यायाम शाळेचे भूमिपूजन सोहळा प्रसंगी सह्याद्री शॉपिंग गाळेधारक संघाचे अध्यक्ष देवा गायकवाड व भाजपचे शहर चिटणीस नागेश सरगम यांच्या शुभ हस्ते पार पडला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी, दत्तात्रय पोसा, अंबादास सरगम व क्रिडाप्रेमी बंधू-भगिनी उपस्थित होते.

 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143