2 1 750x375 1
Economy

म्हणून नाव फलकावर लावण्यासाठीची स्पर्धा लोकशाहीला घातक ठरू शकतो

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

वर्धा- लोकप्रतिनिधींनी गोरगरीबरंजल्यागांजल्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी स्पर्धा करावी. त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी स्पर्धा केली पाहिजेकेवळ नाव फलकावर लावण्यासाठीची स्पर्धा लोकशाहीला घातक ठरतेअसे प्रतिपादन पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी देऊरवाडा आर्वी रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले.  आर्वी येथे नगरपरिषद चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होतेयावेळी मंचावर अमर काळेनागोरा लोंढेआदी उपस्थित होते.  केदार यावेळी बोलताना म्हणालेया जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यावर राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला.  कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधाधान्यपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घेतानाच जिल्ह्यात कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली.  एप्रिल व  मे या दोन महिन्यात नवीन 9 हजार शिधापत्रिका वितरित केल्यातयामुळे गोरगरिबांच्यापरितक्त्या महिलांच्या घरात कुणीही उपाशी झोपण्याची वेळ आली नाही. 

                         जिल्हा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो हे सांगताना त्यांनी  अमरावती जिल्ह्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यातही कॉटन क्लस्टर  निर्माण करण्यात येईल असे सांगितलेआर्वी परिसरात अशा पद्धतीचे  कॉटन क्लस्टर तयार करण्यात येईल. यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरीत्यावर प्रक्रिया करणारे जिनिंग व तयार झालेल्या  कापूस गाठींना  बाजारपेठ उपलब्ध होऊन येथील शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसा मिळेल.  शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी आणि शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते निर्माण करून देणे  या दोन गोष्टी या जिल्ह्यात पुढील एक वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून घेतला आहे.  सिंचन विहिर धडक योजनेचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध होतील अशी ग्वाही  केदार यांनी  यावेळी दिली.  लोक कल्याणकारी कायद्यांसाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहेजेव्हा सर्वसामान्य जनतेला कायदे अडचणीचे वाटतात तेव्हा पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीशी उभा राहीलजनतेच्या खांद्याला खांदा लावून त्या कायद्याच्या विरोधात लढायला तयार असेल अशी हमी  त्यांनी यावेळी बोलताना दिलीयाप्रसंगी अमर काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com