shutterstock 1178791294 1 cropped 1562743631
Axident Maharashtra

माळशेज घाटात विचित्र अपघातात एक ठार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

 पारनेर-  कर्जुलेहर्या येथून दुचाकीवर डोंबिवलीकडे निघालेल्या राजेश बबन आंधळे (वय ४५, कारवस्ती) यांचा सोमवारी दुपारी माळशेज घाटात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांचा भाचा हरेराम संजय माने (वय २०, मानेवस्ती, सावरगाव) गंभीर जखमी झाला. आंधळे हे डोंबिवली येथील शिक्षण संस्थेच्या बसवर चालक होते. गेल्या आठवड्यात ते कर्जुले हर्या येथे आले होते. त्यांचा भाचा माने याची ३ डिसेंबरला अभियांत्रिकीची परीक्षा असल्याने ते सकाळी परत निघाले. सावरगाव येथे मामांना भेटून भाचा हरेराम यास सोबत घेऊन ते पुढे निघाले. माळशेज घाटात बोगदा ओलांडून गणपती मंदिराजवळील वळणावर समोरून येणाऱ्या पिकअप चालकास वेगावर नियंत्रण ठेवला आले नाही. पिकअपची (एमएच १४ एचजी १८०१) आंधळे यांच्या दुचाकीस (एमएच ०५ सीएस २२६५) धडक बसली. राजेश यांचे जागीच निधन झाले, तर भाचा गंभीर जखमी झाला. पिकअप चालक वाहनासह पसार झाला. माळशेज घाट सुरू होईपर्यंत राजेश यांचा भाचा हरेराम दुचाकी चालवत होता. वळणदार घाट असल्याने धोका नको म्हणून राजेश यांनी भाच्यास थांबवून स्वतः दुचाकी चालवण्यास बसले व काही मिनिटांत अपघात झाला.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com