Electricity Maharashtra Solapur City

वीज बिल कमी न केल्यास भाजप आणखी तीव्र आंदोलन करणार: आ. सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- राज्यातील महाआघाडी सरकार जनतेला वीज बिलाच्या प्रश्‍नावरून विनाकारण त्रास देत आहे. उर्जा मंत्र्यांनी 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आता घुमजाव केला आहे. हा एकप्रकारे वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांवर अन्याय आहे. राज्य सरकारने 100 युनिट पर्यंतचे लाईट बिल माफ करावे आणि दिलेले आश्वासन पूर्ण करावे अन्यथा भाजपच्यावतीने यापुढील काळात आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल, पण इशारा आ. सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
भारतीय जनता पार्टी दक्षिण विधानसभा मतदार संघाच्यावतीने शुक्रवारी स्वागत नगर येथील महावितरण केंद्राच्या विरोधात सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. यावेळी नगरसेवक श्रीनिवास करली, अनिता कोंडी, भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात आदींची उपस्थिती होती. आ. देशमुख पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या सांगण्यावरून सुमारे 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस महावितरणने पाठवली आहे. सामान्य वीज ग्राहक आणि शेतकर्‍यांना त्रास देण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारने रचलेले आहे. सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते तर माफ केले नाही उलट सरकारकडून लाईट बिल न भरल्यास वीज कनेक्शन कट करण्याची भाषा सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात सामान्य माणूस मेथाकुटीला आला आहे. त्यांना आलेले लाईट बिल एकदम भरणे शक्य नाही. त्यामुळे आघाडी सरकारने 100 युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करावे व राहिलेले बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा द्यावी, अशी आमची मागणी आहे, त्यासाठी हे आंदोलन राज्यात सर्वत्र सुरू आहे. एवढे करूनही राज्य सरकारने सक्तीची वीज बिल वसुली सुरू ठेवल्यास यापुढे भाजप आणखीन तीव्र आंदोलन करेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामास पूर्णपणे शासनच जबाबदार राहील, असा इशाराही आमदार देशमुख यांनी दिला.

              यावेळी मंडळल अध्यक्ष भीमराव कुंभार, आनंद गदगे, नागनाथ शिवसिंगवाले, रवी भवानी, देवेंद्र मदने, मोहसिन शेख, अर्चना वडनाल, श्रीनिवास आगनूर, इरण्णा मादगुंडे, नरसिंग सरला, शाम काकी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वागत नगर येथील महावितरण केंद्राजवळ मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com