BJP office bearers Governor
Solapur City

भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

महाविकास आघाडी सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणा पासून सोलापूरच्या जनतेची मुक्तता करण्याचे केले आवाहन….

सोलापूर- राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेचा दुरुपयोग आणि सूडबुध्दीचे राजकारण करुन सोलापूरच्या विकास कामांंना जाणीवपूर्वक आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळं सोलापुरातील निरपराध जनता नाहक भरडली जात असल्याची तक्रार सोलापूर शहर भाजपाच्या वतीनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडं करण्यात आली आहे. या संदर्भात सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी 26 सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन देऊन एकूणचं स्थिती संदर्भात सविस्तर चर्चा केली. महाविकास आघाडी सरकारच्या असंवेदनशील कारभारामुळे सोलापूरच्या जनतेचे सुरु असलेल्या हाल-अपेष्टांकडे त्यांचे लक्ष वेधले. जेव्हा पासून राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आहे, तेव्हा पासून सोलापूरच्या प्रगतीपथावर असलेल्या विकास कामांना शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीनं आडकाठी आणण्याचा, त्यात हस्तक्षेप करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरु असलेली विकास कामे ठप्प झाली. स्थायी समिती निवडणूक असो किंवा स्मार्ट सिटीची प्रगती पथावर असलेली कामे असो, यात केवळ विरोधासाठी विरोध करत, येणारी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ज ठेवून विनाकारण जनतेची दिशाभूल करण्याचा आणि धादांत खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न पालिकेतील सर्व विरोधक एकत्रितपणे करत आहेत.

हे वाचा- चिंचणीकरांनी  ग्रामीण व कृषी पर्यटन केंद्र सुरू करावेः आ. सुभाष देशमुख

              केंद्रातील मोदी सरकार असेल अथवा राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी सोलापूरच्या विकास कामांंना दिला. गेल्या 35 वर्षांतील सरासरीचा विचार करता त्याही पेक्षा जास्त निधी या दोनही सरकारने दिला. सोलापूरचा पुढील 50 वर्षांचा सोलापूरचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेऊन नियोजन करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने सर्व पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामे सुरु असताना, विरोधासाठी विरोध करायचा अशी कूटनिती विरोधकांनी अवलंबली आहे याकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. झुंडशाहीचे राजकारण करत स्थायी समितीचे गठण ही तीन वर्षे कायदेशीर दृष्टीने अडचणीत आणून रोखले गेले. न्याय पालिकेच्या आदेशा नंतर निवडणुकीची प्रक्रिया ही मतदाना पर्यंत पोहोचलेली असतानाचं ती पुढे ढकलण्याचे राजकीय षडयंत्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रचले. सत्तेचा पावलो पावली दुरुपयोग करताना, शहरात तीन वर्षांपासून सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या प्रगतीपथावरील विकास कामांनी खो घातला. पालिकेचे तत्कालीन उपायुक्त आणि एलबीटी सारख्या कामात प्रचंड अनियमितता ठेऊन व्यापारी वर्गाला नाहक त्रास देण्याचे काम केलेल्या आणियाच तक्रारीवरुन बदलून गेलेल्या अधिकाऱ्याला स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर कार्यरत करुन सुडाच्या राजकारणाची सुरुवात महाविकास आघाडी सरकारने पध्दतशीरपणे सुरु केली.

महाविकास आघाडी सरकारच्या या घाणेरड्या राजकारणात आणि सत्ता संघर्षात सोलापूरची निरपराध जनता ही नाहक भरडली जात असून, पालिकेतील सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी त्यांची प्रतिमा डागाळण्या साठी स्मार्ट निकृष्ट दर्जाची कामे करण्याचा प्रयत्न ही सुरु आहे, ज्यात भ्रष्टाचाराची ही दाट शक्यता आहे आणि तशा प्रकारची कृती ही सुरु आहे. पालिकेच्या आगामी निवडणुक् डोळ्यासमोर ठेऊन सोलापूरच्या नागरिकांना वेठीस धरण्याचा घाट महाविकास आघाडी सरकार करत आहे. या संदर्भात राज्यपालांनी गांभीर्याने लक्ष घालून सोलापूरच्या सर्वसामान्य जनतेला दिलासा आणि न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ही या निवेदनाद्वारे सोलापूर शहर भाजपाच्या वतीने करण्यात येऊन निश्चितच ते सोलापूर शहरवासियांना न्याय मिळवून देतील असा विश्वास ही भाजपा पदाधिकाऱ्यांनी या निमित्त व्यक्त केला. दरम्यान राज्यातील या असंवेदनशील आणि सूडभावनेतून राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सोलापूर शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जे दंड थोपटले आहेत, त्यास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. सोलापूरच्या निरपराध नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचे कुटील कारस्थान हाणून पाडण्यासाठी आपण खंबीरपणे सोलापूरच्या जनतेच्या पाठिशी राहू असे अभिवचन ही देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्त दिले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143