fbpx
34862c14 107c 4f57 90fe da32b0e0fa2e
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कोरोनाकाळात आर्थिक अडचणीत आलेल्या पथविक्रेत्यांना 10 हजार रुपयांचे कर्ज वितरण,QR कोड व प्रोत्साहनपर पत्राचे वाटप आमदार सुभाष बापू देशमुख व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत दादा पाटील व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना महामारीमुळे ज्यांना सर्वाधिक फटका बसला अशा पथविक्रेत्यांकरिता 10 हजार रुपयांचे कमी व्याजदरात आर्थिक सहकार्य करण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणली होती व ही योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजयुमो सोलापूर शहराचे अक्षय अंजिखाने व सागर अतनुरे व पदाधिकारींनी अनेक ठिकाणी मोफत नोंदणी शिबिर आयोजित करून व वेळ पडल्यावर बँकेत जाऊन लाभार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व या माध्यमातून कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थींना सन्मान करण्यासाठी शिवस्मारक सभागृह येथे कार्यक्रम पार पडला

               प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची कामगिरी ज्या बँकेच्या शाखेत उल्लेखनीय पार पडली त्या बँकेच्या शाखाधिकारींचा सत्कार देखील प्रोत्साहनपर पत्र देऊन करण्यात आले. कार्यक्रमात बोलत असताना प्रदेशाध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांनी भाजयुमो सोलापूर शहराचे कौतुक केले व अवघ्या 2 दिवसात माझा इतका चांगला दौरा लावून सायंकाळी पुन्हा इतका भव्य दिव्य व लोकप्रयोगी कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले व भारतीय जनता युवा मोर्चा ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर योजना जनतेपर्यंत पोहोचवन्यासाठी तत्पर असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले

                 कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष बापू देशमुख यांनी लाभार्थींना कर्ज वेळेवर परतफेड करा असे सांगितले व मोदींजींनी तुम्हाला आता 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. येणाऱ्या काळात ते 50 हजार पर्यंत मदत करतील अशा विश्वास त्यानी व्यक्त करून सर्व भाजयुमो टीम चे कौतुक करत सोलापूर भाजयुमो नेहमीच सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी झटत असते असे त्यांनी मनोगतात सांगितले. अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक प्रशांत नाशिककर साहेबांनी भाजयुमोने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बँक मॅनेजरांचा केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले व आम्ही केलेल्या कामाची पोच पावती म्हणून आज तुम्ही जे सन्मान केलात त्यामुळे आम्ही आज भारावुन गेलो असल्याचे सांगितले. कार्यक्रमास प्रदेश पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष अनुपजी मोरे, सुदर्शन पाटसकर, प्रदीपजी गावडे, गणेश कुठे, भाजप सोलापूर शहर सरचिटणीस शशी भाऊ थोरात, चन्नवीर चिट्टे, समर्थ बंडे उपस्थित होते.

                      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, यतीराज होनमने, महेश जेऊर, शिलवंत चपेकर, संदीप महाले,विशाल बनसोडे,विनोद गडगे,अनिल अंजनालकर, शुभम कुदळे, अंबादास पामु, प्रथमेश कोरे, प्रणय अलकुंटे, संदीप कुलकर्णी, ओम होमकर, डोंगरेश चाबुकस्वार, रोहन मराठे, अशोक कोडम, योगेश कबाडे, श्रीशैल स्वामी, जीलानी सगरी व पदाधिकारींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा पानसे व आभार प्रदर्शन संदिप आबा जाधव यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update