Solapur City

भाजपच्या हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा नारा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3 महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू व तिळगुळ’ तसेच “बुथ संपर्क अभियान व “आपला विश्वास हाच प्रभागाचा विकास” या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी भवानी पेठेतील अथर्व गार्डन येथे तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.सर्वप्रथम जेमिनी मातेच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका सौ. वंदना गायकवाड, नगरसेविका सौ. विजया वड्डेपल्ली, सौ. उषा पाटील, सौ. निर्मला ओझा, सौ. इंदिरा कुडक्याल, सौ. सपना दायमा, सौ. शोभा नष्टे, सौ उषा हक्के, निर्मला महिंद्रकार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाप्रसंगी महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी आणलेल्या नविन योजनेची माहिती यावेळी देण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील महिलांसह हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती राहिली. याप्रसंगी भागातील सौ. शकुंतला मेणगुदले, सौ. बसम्मा हक्के, सौ. गंगुबाई कोने, सौ. करुणा सुरवसे, सौ. अनिता जाधव, सौ. पोतू, सौ. योगिता माने, सौ. कानगंटी, सौ. सोरटे, सौ. मंदकल, सौ. कर्ली, सौ.मल्लमा डोळळे, सौ. बसम्मा जाटगल, सौ. विजया पाटील, सौ. जगदेवी कोळी, सौ. लक्ष्मीबाई हिप्परगे, सौ. शांताबाई कोळूर, सौ. गंजेळी, सौ. पुजारी, सौ. डोळळे, सौ. मेटी, सौ. हब्बा, सौ. कोळी, सौ. तगारे, सौ. होटकर, सौ. स्वामी, सौ. थोरात, सौ पवार, सौ. खाडे. सौ. हजगुंडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिपीन पाटील, विजय पुजारी, विजू कोळी, प्रकाश पुजारी, नागेश कोळी, अप्पी पुजारी, शिवा हक्के, सोमनाथ पिसाळ, दशरथ जाधव, मद्रे काका आदींनी परिश्रम घेतले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143