Solapur City News 81
Health

आ.निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त जप स्लम सेलतर्फे रक्तदान शिबीभार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
ठाणे- महामारीचा प्रसार करणारे कोरोना दूत बनण्यापेक्षा रक्तदान करून कोरोना योद्धा बना.असा संदेश देत .ठाणे भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी दिला.रक्तदानाचा हा उपक्रम कोरोनाच्या संचारबंदीमुळे काळात नोपाडा-कोपरीमध्ये शुकशुकाट असतानाही भाजपने ठाणे शहर (जिल्हा) भाजपचे अध्यक्ष व कोकण पदवीधर मतदार संघांचे आमदार अँड. निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरीतील विद्यासागर विद्यालयात राबवण्यात आला.यावेळी भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते.या रक्तदान शिबीराला ठाणेकरांनी उत्सुर्त प्रतिसाद दिल्याने सायंकाळपर्यत तब्बल ४१ बाटल्या रक्त संकलित करण्याचा संकल्प आयोजकांनी केला होता. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे नियमित होणाऱ्या रक्तदान शिबीरांचे आयोजन सध्या बंद आहे. परिणामी सध्या राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे,भविष्यातही रक्ताची गरज भासणार आहे.या पार्श्वभूमीवर,तसेच,भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार अँड. निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे भाजपा स्लम सेल अध्यक्ष कृष्णा भुजबळ आणि वामनराव ओक रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे पूर्व,कोपरी येथील विद्यासागर विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी
स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण,
कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा,ठाणे जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर,भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण,ठाणे भाजप उपाध्यक्ष राजेश गाडे आदींनी या रक्तदान शिबिराला भेट दिली.याप्रसंगी बोलताना स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर भयंकर ताण असल्याचे सांगुन प्रत्येक नागरिकाने रक्तदानासारख्या उपक्रमात योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले.तसेच,इकडे-तिकडे भटकत राहुन कोरोना दूत बनण्यापेक्षा रक्तदान करून कोरोना योद्धा बनावे.आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाचे प्राण वाचु शकतील.दरम्यान,या लोकपयोगी रक्तदान शिबिराच्या माध्यमातुन कृष्णा भुजबळ यांनी,आ.निरंजन डावखरे यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143