Blood donation camp conducted
Health Solapur City

इंदिरा वसाहत भागात कै. अनुसयाबाई बिद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- कै. अनुसयाबाई रामकृष्णसा बिद्री चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्यावतीने इंदिरा वसाहत भवानी पेठेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कै. अनुसयाबाई रामकृष्णसा बिद्री यांच्या 36 व्या पुण्यतिथी व राखी पौर्णिमेनिमित्त सुरेश बिद्री व मित्र मंडळाच्या वतीने व सोलापूर ब्लड सेंटरच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले असल्याची माहिती सुरेश बिद्री यांनी दिले.

याप्रसंगी मार्कंडेय यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. याप्रसंगी बिद्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश बिद्री, नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेवक महेश कोठे, नागेश बिद्री आदींची उपस्थित होते. वर्षभर सामाजिक कार्य करत अनेक गोर गरिबांना लॉकडाऊन काळात अन्न वाटप, मास्क व सॅनिटायझर वाटप तसेच गरिबांना साड्या वाटप करण्याचे काम या कै.अनुसयाबाई रामकृष्णसा बिद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले की, सुरेश बिद्री यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ट्रस्ट मार्फत अनेक सामाजिक काम करत असून भविष्यात नगरसेवक पदासाठी इच्छुक असून पक्षासाठी व जनतेसाठी असेच कार्य करत राहा असे नगरसेवक पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी एकूण 62 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी विलास बिज्जा, गुरू पवार, अजय उदागिरी, रामन्ना बंदगी, अनिल दुस्सा, नागेश निरंजन, किरण वल्याळ रवी बिराजदार, मिलन ढंगापुरे, प्रशांत इटकल, प्रविण बंदगी आदींनी परिश्रम घेतले.

Blood donation camp conducted

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143