Health Solapur City

लोकमंगल बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त 51 जणांचे रक्तदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- लोकमंगल सहकारी बँकेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 51 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. बँकेचा वर्धापन दिन असल्यामुळे तो साध्या पद्धतीने साजरा केला आणि केवळ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोकमंगल बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

हे वाचा- अखेर उद्या सायंकाळपासून गोव्यात लॉकडाऊनसुरू होणार

                    सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे त्यामुळे स्वयंसेवी संघटनांची रक्तदान शिबिरे बंद आहेत आणि वैयक्तिक रित्या रक्तदान करणारे रक्तदातेही रक्तदान करत नाहीत त्यामुळे ब्लड बँकांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे दुसऱ्या बाजूला कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे रक्ताची गरज जाणवत आहे. अशा या कसोटीच्या काळामध्ये रक्तदान करणे हे एक मोठे सामाजिक कार्य ठरत आहे असे सांगून सुभाष बापू देशमुख यांनी वर्धापन दिनाच्या निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्याची कल्पकता दाखवल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी रक्त संकलन करण्याचे काम डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी ने केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com