Health

ग्रामीण भागात रक्तदान चळवळ वाढावी: सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- कोरोनासारख्या महामारी संकट काळात आज राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आज इंगळगी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराची मुक्तकंठाने प्रशंसा करीत आ. सुभाष देशमुख यांनी ग्रामीण भागात रक्तदान चळवळ वाढावी, असे मत व्यक्त केले.

                    इंगळगी येथील अमर भीम तरुण मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी, सरपंच लक्ष्मी वळसंगे, शिबिराचे संयोजक जितेंद्र गायकवाड, ग्रामपंचायतीचे सदस्य बशीर शेख, सिद्धेश्वर घोडके, विनोद बनसोडे, मौलाली शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, रक्तदान शिबिराचे आयोजन करून अमर भीम तरुण मंडळाने स्तुत्य उपक्रम जयंतीनिमित्त राबविला आहे. यापुढेही शहरांप्रमाणे ग्रामीण भागात देखील रक्तदान शिबिराचे आयोजन व्हावे, असे आवाहन करीत इंगळगी येथे बुद्ध विहार बांधकामास आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. याचबरोबर शिरवळ- इंगळगी धुबधुबी धरण प्रकल्पात उजनीचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, लवकरच प्रत्यक्षात येथे पाणी येईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यल्लाप्पा मासले, मारुती रणखांबे, विकास बनसोडे, सागर धुळवे, भोजप्पा गायकवाड, धनराज वळसंगे, मौलाली मनियार, राजशेखर बंडगर आदींनी परिश्रम घेतले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com