FB IMG 1623125723404
Health Solapur City

शिवस्वराज्य दिनी तेलगाव येथे 111 जणांचे रक्तदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- तेलगाव सिनायेथे 348 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विधाता बहुद्देदेशिय सामाजिक संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 111 जणांनी रक्तदान केले. कोरोनाच्या अस्मानी संकटात सुद्धा विधाता प्रतिष्ठानने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे कौतुक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुगे साहेब यांनी केले तर यावेळी रक्तदान शिबीरास उपस्थित राहिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बंडगरसो व पोलीस कर्मचाऱ्यांनांही रक्तदान करण्याचा मोह आवरता आला नाही. छत्रपती शिवरायांनी संकटकाळी आपल्या प्रजेची काळजी घेतली अगदी त्याचप्रमाणे विधाता प्रतिष्ठानने कोरोनासारख्या महामारीतही रक्तदान शिबीरात खंड पडु न देता या परिस्थितीतही शिबीराचेआयोजन करून आरोग्य खात्याला चांगल्या प्रकारे मदत केली आहे असे तिर्हे येथील प्राथमिक आरोग्य केद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. गोडसे यांनी सांगितले.
           विधाता बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने 2015 ते 2021 या काळात आजवर एकूण 556 बँग रक्तदान केले या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी, जयहिंद शुगरचे चेअरमन बाळासाहेब माने, माजी सरपंच शिवाजी पाटील, सरपंच रेवणसिध्द पुजारी, उपसरपंच प्रभाकर बनसोडे, नानासाहेब जाधव, विठ्ठल लांबतूरे ,अक्षय ब्लड बँकेचे कर्मचारी विधाता बहुद्देशिय संस्थेचे पधादिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com