Solapur City

संभाजी ब्रिगेडने केला वीटभट्टी वरील कामगार मातांचा सन्मान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – जुळे सोलापूर भागातील विश्वनाथ चौगुले यांच्या वीट भट्टीवरील काम करणाऱ्या महिला मातांचा संभाजी ब्रिगेड च्या वतीने वीटभट्टी वर जाऊन मानाचा फेटा बांधून व साडी चोळी भेट देऊन सन्मान करण्यात आला. आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजन करण्यात आले होते खरे पाहता महिला दिनाचे औचित्य साधून शहरात खूप मोठे मोठे कार्यक्रम होतात त्यामध्ये खूप मोठ्या महिलांचा सन्मान होतो परंतु अशा वंचित महिलांकडे सर्वांचे दुर्लक्ष होते समाजापासून व शिक्षणापासून वंचित असलेल्या या महिला भगिनीचा सन्मान होणे गरजेचे आहे असे मत संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले. प्रारंभी याच महिलांच्या हस्ते मासाहेब जिजाऊ चा या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष श्याम कदम संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले भारतीय जैन संघटनेचे शाम पाटील कृष्णा झिपरे संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सीताराम बाबर उपाध्यक्ष नागेश पवार कार्याध्यक्ष अरविंद शेळके सचिन यमगवळी प्रवीण लकशेट्टी आर्यन कदम कृष्णा चाबुकस्वार इत्यादी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143