Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
राम सुतार, जेसुदास, देवडकर यांनी केले मार्गदर्शन
सोलापूर- लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने आयोजित सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिरास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे राम सुतार, उद्योजक संकेत जेसुदास, लोकमंगल बँकेचे निशांत देवडकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात 18 ते 45 वयोगटातील लोकांनी सहभाग नोंदवला होता.
या शिबिरात उमेदवारांना स्वयंरोजगार संधी, उद्योग संधी आणि उद्योगाच्या उभारणीसाठी शासन तसेच बँकेकडून मिळणारी मदत यावर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राम सुतार यांनी शासकीय कर्ज योजना कोणत्या, त्याचा फायदा कसा घ्यायचा यासह उद्योगव्यवसाय बद्दल सविस्तर मार्गदर्शन देऊन प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. संकेत जेसुदास यांनी सकारात्मक दृष्टीकोन, वेळेचे नियोजन आणि उद्योजकीय गुणसंपदाबद्दल मार्गदर्शन केले. तर निशांत देवडकर यांनी कर्ज योजनेत बँकेची काय भूमिका असते, कर्ज प्रकरण करताना बँक काय काय पहाते, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची सविस्तर माहिती दिली. अनुप कुलकर्णी यांनी लोकमंगल फाउंडेशनची भूमिका व सहकार्य कसे असेल या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल कांबळे यांनी केले.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143