Solapur City

तरुणांसाठी सुवर्णसंधी ! लोकमंगल फाउंडेशनतर्फे मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- लोकमंगल फाउंडेशन ने येत्या एक मार्च रोजी सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. ज्या युवक युवतींना स्वयंरोजगार करण्याची इच्छा असेल अशा 18 ते 45 या वयोगटातील उमेदवारांसाठी हे शिबीर असेल आणि ते विनामूल्य असेल. एक मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये हे शिबिर होईल. त्यात उपस्थित उमेदवारांना स्वयंरोजगार संधी, उद्योग संधी आणि उद्योगाच्या उभारणीसाठी शासन तसेच बँका यांच्याकडून मिळणारी मदत या संबंधीच्या योजनांची माहिती दिली जाईल. या शिबिरात मर्यादित उमेदवारांना प्रवेश दिला जाणार असून केवळ 30 लोकांनाच नाव नोंदणी करता येणार आहे. इच्छुकांनी लोकमंगल फाउंडेशन च्या सह्याद्रीनगर होटगी नाका या पत्यावर नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी फोन क्रमांक 0217 260 60 70 किंवा मोबाईल क्रमांक 8855088661 या क्रमांकावर सकाळी दहा ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143