fbpx
MRKKM
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई / पुणे- पुणे पदवीधर मतदार संघातून महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर तर औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांची उमेदवारी, या तरुण उमेदवारांचा अर्ज वैध ठरला असून पदवीधर तरुणांच्या प्रश्नाची जाणीव असलेले तरुण अभ्यासू उमेदवार आहेत.

                          संपूर्ण राज्यात ५ लाख कंत्राटी कर्मचारी मंत्रालय ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या सर्व विभागांत काम करत आहेत. त्यात मंत्रालय, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यातील आस्थापनेवरील कंत्राटी कर्मचारी, मानधनावरील कंत्राटी कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघामध्ये ३.५ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मुंबई मंत्रालायावर धडक मोर्चा काढणे, नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढणे, नागपूर हिवाळी अधिवेशन मध्ये विधानभवनावर धडक मोर्चा काढणे तसेच विशेष मध्ये मुंबई उच्च न्यायालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दाद मागे असे अनेक कार्य महासंघाच्या वतीने मुकुंद जाधवर यांनी केले आहे. राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व शासकीय व निमशासकीय विविध विभागात आस्थापनेवर व कंत्राटदाराकडून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. अशा सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ करत आहे. तसेच सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या हिताचे शासन निर्णय, परिपत्रक, शासन आदेश आदी साठी मंत्रांकडे सतत पाठपुरावा करणे, अजूनही समान काम, समान वेतन असा मोबदला मिळत नाही, एकीकडे कंत्राटे घेणाऱ्या खाजगी संस्था आणि दुसरीकडे सरकारकडून या कंत्राटी कर्मचारी घोर फसवणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आपले प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी कोणतरी वाली निवडणुकीत उभा असल्याने या उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न प्रत्येक कंत्राटी कर्मचारी आपले विशेष योगदान देत असल्याचे सूत्राकडून कळले आहे.

                  तसेच बेरोजगार, शेतकरी, कृषीपदवीधर एमपीएससी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, शिक्षक भरतीच्या प्रतीशिक्षेत असणारे डी.एड, बी.एड धारक यांच्या हक्कसांठी ही निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीमध्ये मुकुंद जाधवर यांची उमेदवारी ही पदवीधर तरुणांच्या प्रश्नाची जाणीव असलेला तरुण अभ्यासू उमेदवार अशी ओळख असल्यामुळे पक्षीय राजकारण सोडून एक अभ्यासु प्रश्न मांडणारा उमेदवार म्हणून ही जाधवर यांच्याकडे पहिले जात आहे. पदवीधर सभासदांच्या तरुणांच्या आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुकुंद जाधवर या निवडणुकीमध्ये उतरले आहेत आणि त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षांच्या उमेदवारांना मुकुंद जाधवर यांचे मोठे आव्हान असणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update