celebrate-shelgi-occasion-diwali
Solapur City Religious

दिवाळी निमित्त शेळगी येथे दीपोस्तव संपन्न अखिल भारतीय सेनेचा उपक्रम

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर –  अखिल भारतीय सेनेचे सरचिटणीस आशा अरुण गवळी यांच्या संकल्पनेतून शेळगी येथे अखिल भारतीय सेनेचे शहर अध्यक्ष सचिन हुंडेकरी यांच्या माध्यमातून 1008 दीपोस्तवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सौ. विद्या भोसले, श्रीमती कस्तुराबाई ढेपे, मा. सचिन हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

         भारतातील सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळीचा. घरात फराळ करण्यापासून ते लेकरांना नटवण्या पर्यँत महिला या हिरिरीने पुढाकार घेऊन कुटूंबात सुखाची पेरणी करत असतात म्हणून अश्या महिलांना एकत्रित वेळ व्यतीत करता यावा आणि सामूहिक दीपोस्तवाच्या माध्यमातून महिलांनी शेळगी परिसर उजळून निघावा आणि अज्ञानाचा, भीती व अंधश्रद्धेचा अंधकार दूर होऊन ज्ञान, विज्ञान व राष्ट्रीय एकात्मतेचा लख्ख प्रकाश सगळी कडे पसरावा या हेतूने सदर 1008 दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले असे अखिल भारतीय सेनेचे शहर अध्यक्ष सचिन हुंडेकरी यांनी सांगितले.

हे  वाचा – पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बसवेश्वर सर्कल सुशोभिकरण व दुरुस्ती कामाचे उदघाटन

         या प्रसंगी सौ. विद्या भोसले यांनी उपस्थिताना दिवाळीच्या शुभेच्छा देत असा सकारात्मक बहाल करणारा उपक्रमाचे दर वर्षी आयोजन करण्यात यावे असे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आशा मुळे यांनी केले तर आभार मा. प्रशांत हिबारे यांनी मानले. दीपोत्सवाच्या यशस्विते करिता सुधा अरळीमार, मंदाकिनी स्वामी, महानंदा ठेसे, जया शेळके, सुनीता मुदाळे, मनोज अरळीमार, बसू ढेपे, विरेश मुदाळे, योगेश ढेपे, गणेश ठेसे, मोहन तलकोकुल, मयूर गवते, विनोद कर्पेकर, विजय छंचुरे, मोहन वड्डेपल्ली, मल्लू सलगरे यांनी परिश्रम घेतले.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews