Solapur City

जनगणनेत आम्ही लिंगायतच लिहीणार- अ‍ॅड.हैबतपुरे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- लिंगायत समाज आता सजग झाला आहे. त्यातही तरूण पिढीमध्ये लिंगायत स्वतंत्र धर्माबाबत जागृती निर्माण होत असल्याने मूठभर सनातन्यांच्या भूलथापांना बळी पडणार नसल्याचा विश्वास व्यक्त करतानांच लिंगायत हा एक स्वतंत्र आणि परिवर्तनवादी धर्म आहे. त्यामुळे आगामी जनगणनेत आम्ही आमचा लिंगायत म्हणूनच नोंद करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र बसव परिषदेचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.शिवानंद हैबतपुरे यांनी केले. रविवारी येथील सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रा.धम्मपाल माशाळकर आणि ज्योतिर्लिंग स्वामी उपस्थित होते. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनास विरोध करणारी मंडळी अगदी काल परवा पर्यंत ’विरशैव लिंगायत’ असे धर्माचे नाव असल्याचे सांगत होते. आता नव्याने काही मूठभर मंडळी ’विरशैव लिंगायत हिंदूच’ असल्याचे सांगत आहेत. लिंगायत समाजाची दिशाभूल करण्याचा हा सनातन्यांचा डाव आहे. आणि हा डाव कदापी यशस्वी होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महात्मा बसवण्णा हे धर्मसंस्थापक आणि वचन ग्रंथ हेच लिंगायतांचे धर्म ग्रंथ असल्याचे अ‍ॅड.हैबतपुरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. माळी, कोष्टी, वाणी, सुतार, बडीगेर, हडपद यासारख्या लिंगायतांच्या पोटजातींनी लिंगायत धर्म मान्यता आंदोलनात एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी गावोगावी जनजागरण करण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143