Solapur City News
Covid 19

आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्रांची संख्या वाढवणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर- कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमासोबतच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर कठोर नियंत्रण करण्यात यावे. त्यासोबतच कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये ६० वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात यावी तसेच ज्येष्ठ नागरिकांचे सुलभपणे लसीकरण करता येईल या दृष्टीने नियोजन करा, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व लसीकरण मोहिमेचा आढावा डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, माहिती संचालक हेमराज बागुल, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. राजेश गोसावी, डॉ. श्रीवास्तव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, महापालिकेचे अप्पर आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी शहरात तसेच ग्रामीण भागात केंद्रांची संख्या वाढवतानाच प्रत्येक केंद्रावर बसण्याची सुविधा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची सूचना करताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, जिल्ह्यात सहा लाख नागरिकांचे लसीकरण करणे अपेक्षित आहे त्यादृष्टीने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करुन दररोज 10 ते 15 हजार नागरिकांचे लसीकरण करता येईल यादृष्टीने नियोजन करावे. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक केंद्रावर मार्गदर्शन व सुविधा केंद्रही सुरू करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात. नागपूर शहर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स यासह 11 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात शासकीय ग्रामीण रुग्णालय व सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय व सुविधा केंद्रावर जनतेचा विश्वास असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी होत असल्यामुळे या सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

जिल्ह्यातील ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात काटोल व नरखेड येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे या भागासह नगरपालिका क्षेत्रात प्राधान्याने चाचण्यांची संख्या वाढविणे तसेच लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com