Economy Election

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ८० टक्के मतदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सहकार पॅनलला घवघवीत मिळणार यश मिळणार ……संचालक राजेंद्र पाटील
ठाणे – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून यापैकी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह आधीचे तीन संचालक आणि दोन नवीन अशा सहा जण बिनविरोध विजयी झाले आहेत उर्वरित १५ संचालक पदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली.यावेळी मतदान करण्यासाठी ठाण्यातील मो ह विद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल आणि महविकास परिवर्तन पॅनेल आमने सामने आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत झालेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या मतदान प्रक्रियेत ८० टक्के मतदान झाले असून सहकार पॅनेलला घवघवीत यास मिळणार अशी प्रतिक्रिया सहकार पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले संचालक राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अटीतटीच्या निवडणुकीचे मंगळवारी मतदान झाले. ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्याच्या बँक सभासदांनी मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत सभासदांनी जागृतपणे मतदान केल्यानेच ८० टक्के मतदान झाले. मतदारानी योग्य उमेदवाराला निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. सहकार पॅनलला घवघवीत यश मिळणार असलायचा विश्वास राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143