fbpx
pimpalgaon pandhari3 750x375 1 केंद्रीय पथकाकडून औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

औरंगाबाद- औरंगाबाद तालुक्यातील निपाणीपिंपळगाव पांढरीपैठण तालुक्यातील गाजीपूरनिलजगावशेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमीढोरेगावजाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या थेट बांधावर जाऊन केंद्रीय पथक प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंताकेंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर.बी.कौल यांनी आज पाहणी करून संवाद साधला. अति पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत दुःख व्यक्त करत शासनाची लवकरच मदत मिळेलअसे आश्वासन शेतकऱ्यांना केंद्रीय पथकाच्या समितीने दिले.

               मुरमी येथील संजय म्हस्के यांच्या शेतातील ज्वारीमकाच्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांनी सदस्यांना  दिली. ढोरेगाव येथील अहेमद जाफर  शेख यांनी सव्वा एकर मका पिकाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. तसेच धर्म बेडवाल यांनीही दोन एकरातील कापसाचे अति पावसाने नुकसान झाले आहे. जाखमाथा येथे सदानंद थोरात यांच्या दोन एकर शेतातील अद्रक खराब झाली असल्यानेबाळासाहेब जाधव यांच्या शेतातील बाजरीवरखेड येथे विकास उबाळे यांच्या एकर क्षेत्रातील मका आणि दोन एकरातील कापूस पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 

         जिल्हाधिकारी  चव्हाण यांनी पथकाच्या पाहणीबाबत सांगताना पथकाने जिल्हातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूसमकासोयाबीनबाजरीअद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहेजास्त पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी करता आली नाहीत्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहेया नुकसानीची योग्य तपासणी पथकातील समिती सदस्यांनी केली आहेत्यामुळे जिल्ह्याला योग्य न्याय मिळेलअशी अपेक्षाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केली. पाहणी दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदींसह  वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

 औरंगाबादपैठण तालुक्यातील शेतकऱ्यांशीही संवाद

औरंगाबाद तालुक्यातील निपाणी येथे सुनील कालानंदू भालेकरसंदीप दुदलदिलीप भालेकरसखाराम पुंगळेलहू भालेकरपिंपळगाव पांढरी येथे विपिन कासलीवालविठ्ठल बहुरेगाजीपूर येथे रामभाऊ राहतवाडेनिलजगाव येथे मच्छिंद्र मोगल आणि शेकटा येथे हरिश्चंद्र भवर यांच्याशी देखील केंद्रीय पथक प्रमुख  गंता आणि  कौल यांनी संवाद साधत नुकसानीची पीक पाहणी केली.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 n केंद्रीय पथकाकडून औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणीडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update