मुंबई- दहावीचा निकाल जाहीर झाला असून त्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढील वर्षात म्हणजे 11 वीमध्ये प्रवेश घेण्याकडे वेध लागले आहे. तर 11 वी साठी सेट परीक्षा शनिवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन असणार आहे. तसेच परीक्षा देणं ऐच्छिक असणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशाबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती होती. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे. 11 वी साठी सेट परीक्षा शनिवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन असणार आहे. तसंच, परीक्षा देणं ऐच्छिक असणार आहे. तसंच, हा पेपर 2 तासांचा असणार असून 11 ते 1 या वेळात होणार आहे. एकूण 100 गुणांचा हा पेपर असेल. स्वरूप हे multiple चॉईस ऑप्शन असणार आहे. एकूण 8 भाषांपैकी एका भाषेतून परीक्षा देता येणार आहे. तर, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 25 गूण आणि सामाजिक शास्त्र (राज्य शास्त्र,इतिहास, भूगोल 25 गुण ) अशी विभागणी करण्यात आली आहे. परीक्षेकरता फॉर्म मात्र ऑनलाईन भरावा लागणार आहे. 20 ते 26 जुलै दरम्यान ऑनलाईन (Online) फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
बापरे ! अशी होणार CET परीक्षा
CET परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात इंग्रजी , गणित , विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत. प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.