images 17
Maharashtra

महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता; पुणे हवामान खात्याचा इशारा

पुणे-  तसेच येत्या 24 तासांत कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तर राज्यात तुरळक ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. सध्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर उत्तर कर्नाटकपासून विदर्भापर्यंत वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. ही स्थिती पुढील आणखी पाच दिवस अशीच राहिल असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं दिला आहे.

हे ही वाचा-

पंढरपूर पोटनिवडणुकीत केलेल्या “मायीचा लाल” वाक्यावर गोपिचंद पडळकरांचे उत्तर
https://youtu.be/Wbx0mzIpuUk

भारतीय हवामान खात्यानं नुकत्याच जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, राज्यात मध्य महाराष्ट्रासह दक्षिण मराठवाड्यात अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत मध्य महाराष्ट्रासह दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जेनेसह वादळी वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com