Crime

कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे दोन खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूर शहरात वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव मुळे मृत्यू दर ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून मृत व्यक्ती झालेल्या व्यक्तींची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे. आज आयुक्त पि.शिवशंकर यांनी स्वतः मृत व्यक्ती यांच्या घरी जाऊन त्या व्यक्तीची मृत्यू कशामुळे झाली किंवा त्यांना काही गंभीर आजार होते का याची माहिती घेतली.त्यानंतर त्यांच्या उपचार करणाऱ्या डॉक्टर यांच्या क्लेनिकला भेट दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आयुक्त पि. शिवशंकर सोलापूर महानगरपालिका यांनी सोलापूर शहर या ठिकाणी डॉक्टरांसाठी आदेश निर्गमित केलेले असताना दिनांक 12-4-2021 रोजी रूग्ण वय वर्ष 84 शांती नगर, विजापूर रोड ,सोलापूर सदर इसमास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ते निर्मल क्लीनिक चे डॉ. युवराज माने वय 44 वर्षे राहणार नवीन आरटीओ जवळ सोलापूर येथे समक्ष जाऊन उपचार घेतले डॉ. युवराज माने यांनी सदर रुग्णाची कोविड19 ची तपासणी केली नाही. तसेच सदर रुग्णाची माहिती महापालिकेच्या नागरिक आरोग्य केंद्रास दिले नाही. तरी सदर इसमास श्वसनाचा त्रास होत असल्याने सदरची इसम दिनांक 14-4-2021 रोजी सकाळी 9:20 मिनिटांनी ई.एस.आय हॉस्पिटल होटगी रोड सोलापूर शहर येथे कोविड वार्डात आंतररुग्ण म्हणून दाखल झाले त्याच दिवशी सकाळी 9:55 मिनिटांनी सदर इसमाचे निधन झाल्याचे डॉ.पी.आर नंदीमठ यांनी कळवले त्याचे पोस्टमार्टम करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे त्यांची कोविड तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तरी निर्मल क्लेनिकचे डॉ. युवराज माने वय 44 राहणार नवीन आरटीओ जवळ विजापूर रोड सोलापूर हे सदर इसमाचे तपासणीत हलगर्जीपणा केल्यामुळे मा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर शहर तथा विशेष प्राधिकता कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उक्तीप्रमाणे निर्गमित केलेल्या वरील आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
                   अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकी जवळ डॉ. जी.बी विश्वासे यांचे नित्यानंद दवाखाना आंध्र बँकेसमोर, रविवार पेठ येथे असल्याने त्याठिकाणी भेट दिली असता त्यांचा रजिस्टर चेक केल्याने अनियमित आढळून आले.त्यांच्या कडील आलेल्या पेशंटची माहिती व्यवस्थित देत नसल्याने तसेच सौम्य लक्षणे असलेल्या व माध्यम लक्षने असलेल्या व्यक्तींची कोरोना तपासणी करण्याकरिता आरोग्य केंद्राकडे माहिती देत नसल्याने त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com