cheating-health-department-exam
Crime School & Collage

आरोग्य विभागाच्या परीक्षेत कॉपी करताना तिघांना पकडले

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अंबाजोगाई- आरोग्य विभागाच्या गट-ड पदासाठी अंबाजोगाईतील १६ केंद्रावर रविवारी परीक्षा झाली. १६ पैकी दोन परीक्षा केंद्रावर तीन परीक्षार्थी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस व चिपचा मजकूर कागद वापरून हायटेक काॅपी करताना आढळून आले. त्यांच्या उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

      एका केंद्रावर परीक्षार्थी बुटात इलेक्ट्रॉनिक उपकरण ठेवून कानातील रिसिव्हरद्वारे कॉपी करताना आढळला. अशा प्रकारे हायटेक कॉपी करणाऱ्या एकूण तीन जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. झनकसिंग शिवसिंग सिसोदे (रा. नागुनीची वाडी, पोस्ट गोलटगाव, औरंगाबाद), विक्रम जादुसिंग बहुरे (रा. सागरवाडी ता. बदनापूर) व सचिन हिरालाल गोमलाडू (रा. राजपूतवाडी, पोस्ट देवगाव रंगारी, औरंगाबाद) अशी उमेदवारांची नावे आहेत. योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र जोशी यांच्या तक्रारीवरून तिघांवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी २ ते ४ या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. या केंद्रावर भरारी पथकप्रमुख डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी भेट दिली तेव्हा त्यांना जनकसिंगबद्दल संशय आला. त्याची तपासणी केली असता बुटात इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळून आले. शेजारच्या परीक्षा हॉलमध्ये विक्रमदेखील इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या साहाय्याने कॉपी करताना पर्यवेक्षक आनंद जोशी यांना आढळून आला.

भंडाऱ्यात आरोग्य विभागाचा पेपर फुटला
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर जिल्ह्यातील मोहाडी येथील केंद्रावर फुटला आणि तो समाजमाध्यमावर आल्याने खळबळ उडाली. दुसरीकडे तुमसर केंद्रावर नियोजनाअभावी परीक्षार्थींना मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेकांचे रोल नंबर परीक्षा केंद्रावर नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143