nagpur kavyasangraha 1 750x375 1
Economy School & Collage

मुख्य अभियंत्यांच्या ‘ऊर्जाफुले’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर – राज्याच्या वीज निर्मिती कंपनीत भुसावळ येथे मुख्य अभियंता असणारे विवेक पांडुरंग रोकडे यांच्या ‘ऊर्जाफुले’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले. बेझनबाग येथील निवासस्थानी हा  छोटेखानी प्रकाशन सोहळा पार पडला. पालकमंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी  रोकडे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक केले. ऊर्जा विभागात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना सुद्धा त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेला या पुस्तकाच्या माध्यमातून न्याय दिल्याची प्रशंसा त्यांनी केली. निसर्ग व मानवी मनाच्या संवेदना व्यक्त करणाऱ्या या काव्यसंग्रहाला ‘ऊर्जाफुले’ हे समर्पक नाव रोकडे यांनी दिले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्यातील कलागुणांना जपावे, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच ऊर्जा विभागातील अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com