Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
अकलूज License fee recovery- माळशिरस तालुक्यातील अकलूज व इतर आठ गावातील प्रादेशिक विकास प्राधिकरण अंतर्गत परवाना शुल्क वसुली संदर्भात दोशी असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर २० डिसेंबर ला मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला होता. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात कुठेही मुख्यकार्यकारी अधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी दिसल्यास त्यांच्या तोंडाला काळे फसणार असल्याचे साठे यांनी सांगितले होते.
माजी आमदारासह 29 जणांना जुगार प्रकरणात अटक, 6 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त
License fee recovery सोलापूर जिल्ह्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांना बोलावून चर्चा करण्यासाठी सूचना केली होती, त्या अनुषंगाने चर्चा झाल्यानंतर गटविकास अधिकारी माळशिरस यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी किरण साठे यांचे दूरध्वनी वरून संपर्क साधून बोलणे करून दिले. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत त्यांची मुदत २२ डिसेंबर ला संपत आहे,सदर नोटिसाचा खुलासा व इतर अनुषंगिक बाबी पाहून योग्य ती नियमाप्रमाणे २३ डिसेंबर पर्यंत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामींनी साठेंना दिले आहे.त्यामुळे २० डिसेंबरचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याचे साठेंनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २३ डिसेंबर पर्यंत कारवाई करण्याची हमी दिली आहे,त्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही तर या पुढचे आंदोलन हे गनिमीकावा पद्धतीचा वापर करून करणार मग मला कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागला तरी बेहत्तर,त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोठया प्रमाणावर जनआंदोलन उभारणार आहे.
किरण साठे
सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – सोलापूर जिल्हा

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews