Economy

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा!

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय लष्करातील जवान, अधिकारी अशा सर्वांना ७३ व्या लष्कर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, सदैव सज्ज, सावध आणि सतर्क जीगरबाज जवान आणि लष्करातील माझ्या बांधवांना मानाचा मुजरा! तुम्ही आहात, म्हणून आम्ही इकडे निश्चिंत आहोत. कोरोना संकट काळातही तुम्ही सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. तुम्हा सर्वांना भारतीय लष्कर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. भारतमातेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांना कोटी कोटी प्रणाम. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांच्या त्याग, समर्पणाला सलाम. तुमचे शौर्य, धैर्य यांच्याप्रति आम्ही सदैव कृतज्ञच राहू या विनम्र ग्वाहीसह. भारतीय लष्करदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143