Maharashtra Solapur City

महिला व बालकल्याण विभागातर्फे अत्याचारीत व पिडीत महिलांसाठी चालविण्यात येणाऱ्या सखी वनस्टॉप सेंटरची आमदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी.

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

या प्रकल्पाची माहिती पिडीतांपर्यंत पोहचविण्याचे गरज असल्याचे मत व्यक्त केले.

सोलापूर- आज दि. 29 मार्च 2021 रोजी दयानंद कॉलेज परिसरात महिला व बालकल्याण विभागातर्फे अत्याचारीत व पिडीत महिलांकरीता चालविण्यात येणाऱ्या सखी वनस्टॉप सेंटर येथे आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट देवून पाहणी केली. या सेंटरमध्ये कौटुंबिक हिंसाचार पिडीत, बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण, बालविवाह, हुंड्याकरीता छळ, ॲसिड हल्ला, महिला तस्करी, बाल लैंगिक शोषण पिडीत व अपहरणग्रस्त महिलांसाठी एकाच छताखाली मदत केंद्र चालविण्यात येत आहे. या सेंटरमध्ये सदर अत्याचारीत महिलांसाठी आपातकालीन मदत, वैद्यकीय मदत, आश्रय सुविधा, समुपदेशन, पोलीस मदत व कायदेविषयक सल्ला देण्याची संकल्पना राबविण्यात येत आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनी पाहणी केली असता या सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 6 महिन्यांपासून अद्यापपर्यंत वेतन झालेले नाहीत असे निदर्शनास आले आहे. तसेच या सेंटरच्या बांधकामासाठी शासनाने जागा व निधी उपलब्ध करून दिले असले तरीही अद्यापपर्यंत त्याबद्दल कोणतीही कार्यवाही झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या सेंटरबद्दलची माहिती सर्वसामान्य जनतेमध्ये व पिडीत व अत्याचारीत महिलांपर्यंत पोचण्याकरीता कोणतेही प्रचार व प्रसार करण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी महिला व बालविकास अधिकारी खोमणे यांच्याशी संपर्क साधून त्याबद्दल जाब विचारला व प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143