chinchanikars-should-start-rura
Solapur City Environment

चिंचणीकरांनी  ग्रामीण व कृषी पर्यटन केंद्र सुरू करावेः आ. सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

चिंचणी येथे जागतिक पर्यटन दिन साजरा

सोलापूर-  चिंचणीकरांनी आता ग्रामीण व कृषी पर्यटन केंद्र सुरू करावे, यातून लोकांना रोजगार उपलब्ध होईल याचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात येईल, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले. सोमवारी  जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने  आमदार  सुभाष  देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघातील अनेक गावचे सरपंच, पदाधिकार्‍यांना घेऊन चिंचणी गावाची पाहणी केली व याच धर्तीवर त्या गावांमध्ये वृक्ष लागवडीसह गावचा विकास लोकसहभागातून करण्याचे आवाहन केले.

हे वाचा- शेतकऱ्यांना नुकसानीची सरसकट नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री धनंजय मुंडे

    chinchanikars-should-start-rura

         तालुक्यातील चिंचणी या गावांमध्ये लोकसहभागातून उभ्या केलेल्या वनराई मुळे गावातील वातावरण निसर्ग संपन्न झाले आहे.  गावातील भौतिक सुविधा व विकासाबरोबर गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासून लावण्यात आलेल्या व संगोपन केलेल्या झाडामुळे चिंचणी येथील वातावरण बाहेरील लोकांना आकर्षित करत आहे, असे आ. देशमुख म्हणाले.    यावेळी उपवनसंरक्षक  धैर्यशील पाटील, अजित कंडरे, मयुरी वाघमारे, विपुल लावंड  आणि गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143