Solapur City

जनतेची कामे करणाऱ्याला निवडून द्या- सुरेश पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

इंदिरा वसाहतीत बुथ संपर्क अभियान संपन्न
सोलापूर- इंदिरा वसाहत भागामध्ये बुथ संपर्क अभियाना अंतर्गत नागरीकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनतेची कामे करणाऱ्या उमेदवाराला नागरिकांनी निवडून द्यावे. भविष्यात कोणतेही संकट या भागात येऊ देणार नाही अशी माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले. इंदिरा वसाहत भागातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी सुरेश बिद्री, परशुराम संदुपटला, अजय उदागिरी, बापू येळकोट, बाळू मेंगजी, राजूशा पवार, प्रताप मेरगु, किसन घोडके, कणकय्या कोडूर, सैपान हुंडेकरी आदींची उपस्थिती होती.
                 भवानी पेठेतील इंदिरा वसाहत येथे नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी बुथ संपर्क अभियानांतर्गत बुथ पे चर्चा ठेवण्यात आले होते. प्रभागात दररोज नागरिकांची अनेकदा तक्रारी येत असून पालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता, ड्रेनेज तक्रार, दिवाबत्ती, पाणी पुरवठा सुरळीत आहे की नाही याबद्दल अनेक नागरिकांनी विविध तक्रारी मांडले.
                    नगरसेवकपदासाठी सर्वजण इच्छुक आहेत. परंतु जनतेला सोबत घेऊन कामे करणाऱ्या उमेदवाराला संधी नक्की द्या अशी माहिती पाटील यांनी दिले. सदर भागात पालिकेचा दिवाबत्ती बद्दल कोणतीही अडचण नसल्याने पालिकेच्या इलेक्ट्रिक सुपरवायझर शिवाजी मोरे यांनी उत्तम काम करत असल्याचे कौतुक केले आहे. परंतु कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चांगलाच समाचार घेत यापुढे नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून घ्या अशी तंबी दिली आहे. आम्ही बुथ पे चर्चेचे आयोजन केल्यामुळे सर्व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत नागरिकांच्या ९०% कामे पूर्ण केली आहेत अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिले.
                 याप्रसंगी भागातील सौ. निरंजन, सौ. हबीब, सौ. कंटी, सौ. दासरी, सौ. बाराटक्के, सौ. रामपुरे, सौ. जक्कन, सौ. चिकनी, सौ. जितुरी, सौ. क्यतम, जयराज जितुरी, शहारवाले, प्रवीण कैरमकोंडा, राम मड्डी व भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किरण वल्याल, नागेश बिद्री यांनी काम पाहिले. कार्यक्रमाची प्रास्ताविक सायण्णा गालपल्ली यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ मिस्किन यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143