Citizens should focus on vaccination
Covid 19 Maharashtra

विकासकामांना गती देण्यासाठी कोरोना नियंत्रणात असणे आवश्यक; नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

नाशिक- कोरोना वाढला तर विकासकामांचा वेग रोखला जातो. त्यामुळे कोरोनाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यासाठी नागरिकांनी कोरोना व लसीकरणाकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. येवला तालुक्यातील न्याहारखेडे, नगरसुल व मातुलठाण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते  करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साहेबराव मढवई,पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, न्याहारखेडेच्या सरपंच कमलाबाई मोरे, नगरसुलच्या सरपंच मंदाकिनी पाटील, प्रकाश वाघ, तहसीलदार प्रमोद हिले, सहाय्यक अभियंता सागर चौधरी यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी

            यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाच्या कालावधीत मागे पडलेली विकासकामे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. त्यामुळे अर्थचक्रासोबतच विकासकामांना गती प्राप्त होत असल्याचेही पालकमंत्री भुजबळ  यावेळी सांगितले. मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले असून यावर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही.  या प्रकल्पातुन पाणी येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews