Health

सिव्हिल हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे – ऑक्सिजन तुटवडा भासत आल्याच्या अनेक बातम्या आपण गेले काही दिवसापासून पहिल्या शनिवारी।ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड सेंटर मध्ये देखील ऑक्सिजन तुटवडा भासत असल्याने रुगणांना इतरत्र हलवण्यात आले त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु आता घाबरू नका ऑक्सिजनचा साठा येण्यास सुरुवात झाली आहे रविवारी सकाळी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिलमधील कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन साठा घेऊन एक टँकर दाखल झाला आहे.त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुगणांना चांगल्याप्रकारे उपचार देण्यात येत आहे.त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यासाठी सिव्हिल सर्जन कैलास पवार स्वता लक्ष देत आहे.आता ऑक्सिजनचा मुबलक साठा देखील उपलब्ध झाला आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन नये हळूहळू सर्व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन मुबलक साठा उपलब्ध होत आहे.तरी नागरिकांनी आपल्या वैद्यकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आव्हान आम्ही करत आहोत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143