Maharashtra Gov National

‘इमारत संस्थेची जमिनीची मालकीदेखील संस्थेची’ सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी मानीव अभिहस्तांतरण मोहीम

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अधिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानवी अभिहस्तांतरण प्रक्रियेची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून संस्थासाठी आजपासून ते  15 जानेवारी 2021 पर्यंत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यामोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशिर हक्क, विकासकाकडून प्राप्त करुन घेण्यात येणार आहे. म्हणजेचे ‘इमारत संस्थेची जमिनीची मालकीदेखील संस्थेचीच’ विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे.  मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्थांनी तालुका उपनिबंधक/सहायक उपनिबंधक यांच्या कार्यालयाकडे मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा. सहकारी गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरणाची प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी  लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी केली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांच्याकार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन भोळे यांनी केले आहे.     यासंबंधीत शासन निर्णय, परिपत्रके, इतर माहिती http://housing.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   

आवश्यक कागदपत्रे :

  • मानीव अभिहस्तांतरणाकरीता नमुना7 मधील अर्ज
  • सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र /Deed of Declaration ची प्रत.
  • संस्थेच्या/ कंपनीच्या साधारण सभेतील मानीव अभिहस्तांतरण करण्याबाबत केलेल्या ठरावाची प्रमाणीत प्रत.
  • मिळकत पत्रिकांचा तीन महिन्याच्या आतील उतारा (मालमत्ता पत्रक, 7/12उतारा इ.)
  • संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची/संचालकाची विहित नमुन्यातील यादी.
  • सहकारी गृहनिर्माण संस्थेने/ कंपनीने अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी अधिनियम1970 अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस/पत्रव्यवहाराचा तपशिल व घटनाक्रम.
  • नियोजन /सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र.
  • संबंधित संस्थेकडे / कंपनीकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या /दायित्वे स्विकारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com