collector-tehsildar-in-solapur
Maharashtra Maharashtra Gov Solapur City

सोलापुरातील उपजिल्हाधिकारी , तहसीलदारांच्या झाल्या बदल्या.

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची पंढरपूर प्रांताधिकारी बदली झाली असून त्यांच्या जागी विठ्ठल उदमले यांची नियुक्ती झाली आहे.अन्नधान्य वितरण अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना मंगळवेढ्याचा प्रांताधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांची सांगली जिल्ह्यात महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची भंडारा निवासी उपजिल्हाधिकारी तर मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची उस्मानाबाद जिल्ह्यात विशेष भू संपादन अधिकारी म्हणून नियुक्त झाली आहे.

                          महसूल विभागाने राज्यातील १४ तहसीलदारांच्या बदल्या केल्या असून मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांची सातारा स्थावर व्यवस्थापक राज्य शेती महामंडळ पदी बदली झाली आहे.करमणूक कर शाखेचे बाळासाहेब शिरसाट यांची अक्कलकोट तहसीलदार पदी तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे तहसीलदार प्रदीप शेलार यांची अमरावतीला बदली झाली आहे. सोनाली मेटकरी या सोलापूरला करमणकू कर अधिकारी पदावर येत आहेत.मोहोळचे नायब तहसीलदार राजकुमार लिंबारे यांची पदोन्नती झाली आहे.प्रशांत बेडसे यांची मोहोळच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे. रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते यांची उस्मानाबादला तर उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या बदली रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारीपदावर झाली आहे.उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पदी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143