Maharashtra Gov National

दिलासादायक ! मुंबईकरांना मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. पुढील काळातील तीन ते चार वर्षे मुंबईसाठी विशेष असतील. सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मेट्रो मार्गिका ७ व २ (अ) मार्गावरील पहिल्या मेट्रो कोचचे अनावरण, चारकोप मेट्रो डेपो संचलन आणि नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचे उद्घाटन आणि ब्रँडिंग मॅन्युअलचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, कपिल पाटील, विलास पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईला नियोजनबद्ध आखीव रेखीव स्वरूप

              मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले, मुंबईचा विस्तार होतोय. मुंबई मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होईल. कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांमुळे मुंबईला नियोजनबद्ध आखीवरेखीव स्वरूप देत आहोत. आजचा दिवस मुंबईसाठी वैशिष्ट्यपूर्ण असून या शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. कोरोना काळात मुंबईची लोकल सेवा बंद होती. ती १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करणे आणि गर्दी होणार याची दक्षता घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

 

solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143