Environment Fund

प्रभाग 5 निखिल थोबडे नगर येथे पाणी पुरवठा पाईपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद दादा चंदनशिवे यांच्या विशेष प्रयत्नातून आज दि. 17/3/2021 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रभाग 5 वसंत विहार निखिल थोबडे नगर या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा योजने अंतर्गत रु.10:लाख रक्कमेच्या पाणीपुरवठा पाईपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ या भागातील उपस्थित नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद दादा चंदनशिवे मंडई व उद्यान समिती सभापती नगरसेवक गणेश पुजारी नगरसेविका ज्योती बमगोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीतीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. निखिल थोबडे नगर येथील वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची अडचण असल्याने तेथील नागरिकांची पाणीपुरवठा लाईन करण्याबाबत वारंवार मागणी होती या मागणीला अनुसरून या भागाचे नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे गणेश पुजारी ज्योति बमगोंडे यांनी गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न केल्यामुळे आज अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या कामास सुरुवात करून आम्हाला निखिल थोबडे नगर वासियांना न्याय देण्याचे काम या भागाचे नगरसेवक यांनी केले असे मान्यवरांनी भावना व्यक्त केले.
या प्रसंगी या कार्यक्रमास
सौ नम्रता फुलारी विद्या बाबर रेश्मा जाधव गायत्री बनकर
आश्वानी गुंड शुबदा गांधी शोभा पवार प्रीती गोयल बबिता चव्हाण शोभा सातपुते कविता शिंदे या महिलांच्या तसेच मा बाळकृष्ण वाघचवरे श्रीराम फुलारी गजानन जमदाडे ज्ञानेश्वर वाघचावरे सुरेश गवळी धनाजी बाबर पाटील साहेब सोमेश गवळी तात्यासाहेब पाटील रमेश जाधव नागेश गवळी यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी मा भाऊसाहेब सुरवसे मुकेश मोकाशे
आकाश पुजारी अक्षय साळुंखे सुरज पाटील सुरज जगताप विजयकुमार बमगोंडे महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग तसेच या प्रसंगी नगरसेवकांनी तसेच हृदयनाथ शेरा मोकाशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143