committee-dismissed-appointed-new
Maharashtra

committee : शालेय व्यवस्थापन समित्यांचा कालावधी संपलेल्या समित्या बरखास्त करून नवीन व सुजाण समित्यांची नेमणूक करा – शिवराम गायकवाड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

श्रीपुर committee – माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्या निवडी जाहीर झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी पदाधिकारी जिल्हा परिषद शाळेत पाल्य नसताना पदाधिकारी झालेले आहेत. गावगाड्यातील राजकीय दृष्टिकोण डोळ्यासमोर ठेवून अनेक पुढाऱ्यांनी आपले गोचीड व्यवस्थापन समितीमध्ये सोडलेले आहेत असा आरोप अनेक गावातील पालकांच्या मधून सूर निघत आहे. शालेय व्यवस्थापन समित्या या राजकारणी लोकांचा अड्डा बनलेला आहे. खरंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हा विद्यार्थ्यांचा पाया मानला जातो शालेय व्यवस्थापन समिती शाळेमध्ये अनेक सुधारणा करीत असतात जेणेकरून जिल्हा परिषद शाळेमध्ये पालकांनी आपली मुले इंग्लिश मीडियम मध्ये न घालता जिल्हा परिषद मध्ये पाठवावी अशी आदर्श शालेय व्यवस्थापन समिती असावी. ज्यांना शालेय व्यवस्थापन समितीचा अर्थ कळत नाही असेही अर्थहीन लोक पदाधिकारी झालेले आहेत. अनेक शालेय व्यवस्थापन समितीमध्ये स्वतःची मुली दुसऱ्या शाळेत आणि समितीमध्ये पदाधिकारी मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत असे प्रकार झालेचे दिसत आहे. काही ठिकाणी निवडीच्यावेळी ग्रामपंचायत सदस्य यांनीसुद्धा वेळप्रसंगी समर्थन दिलेले आहे.
                  committee जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी पालकांना निवडीबाबत पूर्वकल्पना न देता बैठक आहे असे सांगून निवडी केलेल्या आहेत .अशा अनेक पालकांची तक्रार आहे त्यासाठी माळशिरस पंचायत समितीचे गटविकासअधिकारी,शिक्षणविभागाचे शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी सदरच्या निवडी रद्द करून नियमाने पुन्हा निवडी उपस्थित सर्व पाल्य असणाऱ्या पालकांच्या समवेत कराव्यात. पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या गटातील निवडीची माहिती घ्यावी. शिक्षण विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शालेय व्यवस्थापन committee समित्या नवीन स्थापन कराव्यात अन्यथा शिक्षण विभागास वेगळ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड यांनी यावेळी दिला अशा आशयाचे निवेदन शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेबांकडे देण्यात आले.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com