fbpx
compitation-team-won-the-cup

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित

सोलापूर Compitation- बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे श्री येमाई देवी क्रिकेट क्लबच्या वतीने ‘ओमप्रकाश ठाकरे चषक’ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली. यामध्ये जे.आर. सीसी उपळाई ठोंगे संघाने राज्यकर्ते बारलोणी संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील मूलभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करावे – गिरीष महाजन

          Compitation स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष होते. एकूण 24 संघांनी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामना जे.आर. सीसी उपळाई ठोंगे विरूद्ध राज्यकर्ते बारलोणी यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना जे.आर. सीसी संघाने निर्धारित पाच षटकात 4 बाद 66 धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेला राज्यकर्ते संघ षटकात 4 बाद 59 धावांवर आटोपला. जे.आर. सीसी उपळाई ठोंगे संघाने हा सामना 7 धावांनी जिंकत 51 हजार रुपये व चषक असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. वैभव वैद्य हा सामनावीर ठरला.

उपविजेत्या राज्यकर्ते  Compitation बारलोणी संघास 31 हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांकाचे 21 हजार रुपये व चषक हे बक्षीस छत्रपती सीसी चारे संघाने तर, चौथ्या क्रमांकाचे 11 हजार रुपये व चषक हे बक्षीस मोडनिंब संघाने पटकाविले. मालिकावीरचा किताब प्रदीप जगदाळे (छत्रपती सीसी चारे) याने पटकाविला. उत्तरेश्वर तांबारे (राज्यकर्ते बारलोणी) हा उत्कृष्ट फलंदाज तर, संदीप बागल (राजभोसरे सीसी) हा उत्कृष्ट cricket गोलंदाज ठरला.

प्रथम पारितोषिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कौरव माने यांनी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सोमनाथ ठाकरे यांनी, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अंगद गवळी यांनी तर, चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक फारुक आतार यांनी दिले होते. स्पर्धेसाठी महेश नलवडे, अभी ठाकरे, लहू गवळी, अक्षय वांगदरे, रणजित माने, सूरज चौधरी, सुज्ञेश तिकटे, सूरज नलवडे, संकेत तिकटे यांच्यासह यमाई देवी क्रिकेट क्लब चे सर्व खेळाडू व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update